Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ॲड यादवराव धोटे महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ॲड यादवराव धोटे महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - ॲड यादवराव धोटे मेमोरियल सो...

  • ॲड यादवराव धोटे महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
ॲड यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालित ॲड यादवराव धोटे महाविद्यालय येथे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून क्रांतीज्योतींच्या प्रेरणेचे धडे घेऊन आयुष्यातील संघर्षाला समोर जाण्याकरिता त्यांचा आदर्श ठेवला व त्यांचा शिक्षणाचा महामेरू विद्यार्थ्यांनी गिळंकृत केला. यावेळी 11वी कला शाखेच्या विद्यार्थिनींनी प्रियंका अनिल मडावी व शुभांगी आबाजी साळवे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीमाईच्या कार्याचा गौरव करून विद्यार्थिनींनी त्यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. या कार्यक्रमाकरिता अध्यक्षस्थान ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. दिनेश दुर्योधन यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका रेणुका देशकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख मनीषा राखुंडे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी गणही उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कार्तिक हेपट, अंकुश महाकुलकर यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्पना दुधे, संचालन खुशी बंडू मडावी हिने तर आभार कल्याणी मारोती जाभोर हिने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top