Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही : शिवानी वडेट्टीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही : शिवानी वडेट्टीवार अल्ट्राटेक कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासाठी विजय क्रांती कंत्राटी कामगार संगटना...
  • मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही : शिवानी वडेट्टीवार
  • अल्ट्राटेक कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासाठी विजय क्रांती कंत्राटी कामगार संगटना मैदानात
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मागील सात दिवसापासून विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने  आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यामध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या घेऊन सुरू असलेल्या काम बंद आंदोलन स्थळी कामगार संघटनेच्या अध्यक्ष व पालक मंत्री यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी भेट दिली. कामगारावर होत असलेला अन्याय, अत्याचार मागील वीस वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगितले. कामगारांच्या रास्त मागण्या जोपर्यंत पूर्णत्वास जाणार नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असा भरोसा विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेची अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार यांनी दिला.
आत्ता सुरू असलेले आंदोलन असेच सुरू राहील यासाठी कामगारांनी खचून न जाता नवीन उमेदी सहित आंदोलनात सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या नम्रता ठेमसकर यांनी कामगारांना पाठिंबा दर्शवित पक्षश्रेष्ठींशी बोलणे करून लवकरात लवकर कामगारांच्या मागण्या मान्य करून घेतल्या जाईल असे अभिवचन दिले तर कामगाराच्या हितासाठी मला सुद्धा आंदोलनात बसण्याची वेळ आली तर मी मागे पुढे पाहणार नाही. कामगाराच्या हिताकरिता प्रसंगी रस्त्यावर उतरेल असे विचार चंद्रपूरच्या माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका सुनीता लोडिया यांनी मांडले.
कामगारांचे मनोबल वाढवण्याकरता चंद्रपूरचे नगरसेवक नंदू नागरकर यांनीसुद्धा कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभार, आवर्ती आणि अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणा वरती ताशेरे ओढले. विजय क्रांती कामगार संघटनेच्या वतीने कंपनीच्या दत्तक गावांमधील तळोदीच्या सरपंच जनेकर,   आवारपुर सरपंच प्रियंका दिवे, नोकरीच्या सरपंच संगीता मडावी उपस्थित होत्या. परिसर गावातील अनेक सरपंचानी कामगारांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा घोषित केला. शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते अंबुजा सिमेंट उपपरवाही, अल्ट्राटेक सिमेंट आवारपुर, एसीसी सिमेंट घुगुस येथे विजय क्रांती कामगार संघटनेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन करत विजय क्रांती कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे यांनी कामगाराच्या रास्त मागण्या कंपनीकडून पूर्ण करून कामगार वरती होत असलेला अन्याय थांबवले पाहिजे असे विचार व्यक्त केले. यावेळी परिसरातील सिमेंट कारखान्यातील कामगार सोबत अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मधील शेकडो कामगार आवर्जून उपस्थित होते.
मात्र मागील सात दिवसांपासून बंद अवस्थेत असलेल्या सिमेंट कारखान्याचे दिवसागणिक लाखो रुपयाचे होत असलेले नुकसान आणि कामगारांचा दिवसागणिक बुडत असलेल्या रोजगार, शिवाय कामगार वर्गामध्ये निर्माण झालेली कंपनी प्रशासना विरोधची वैचारिक लाट, याचा शेवट कशात होईल हे सांगणे आजच्या घडीला कठीण झाले आहे. सिमेंट कंपनी प्रशासन आंदोलन करत असलेल्या आपल्याच कंपनीच्या कामगारांशी संवाद साधणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top