Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कत्तलीसाठी नेट असलेले २८ गोवंश कंटेनरसह जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कत्तलीसाठी नेट असलेले २८ गोवंश कंटेनरसह जप्त तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात विरुर पोलीसांची कार्यवाही अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी ...

  • कत्तलीसाठी नेट असलेले २८ गोवंश कंटेनरसह जप्त
  • तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
  • विरुर पोलीसांची कार्यवाही
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
विरुर स्टेशन -
विरूर पोलीस स्टेशन हद्दीतून तेलंगाणा कडे मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी केली जाते. गोवंश घेणारे दुर्गम क्षेत्रातून कवडीमोल भावात पशुधनाची खरेदी करून कत्तलीसाठी तेलंगाणात नेट असतात. गोवंश भरून नेत असलेले असेच २८ गोवंश नेट असलेले एक कंटेनर विरूर पोलिसांनी जप्त केले. 
विरूर पोलीस स्टेशन हद्दीतून तेलंगाणाकडे कंटेनरमध्ये कोंबून जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार राहुल चव्हाण यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी लक्कडकोट महामार्गवरील सोंडो गावाचे पुलाजवळ बॅरीकेटींग पंचांसह नाकेबंदी केली. एक कंटेनर राजुरा कडुन लक्कडकोट कडे येत असतांना दिसताच त्याला थांबवून पंचांसमक्ष पाहणी केली. कंटेनर क्र. टिएस १२ युडी ०५४९ मध्ये २८ नग जिवंत बैल निर्दयतेने डांबुन कत्तलीकरीता महाराष्ट्र सिमावर्ती भागातुन तेलंगाणा राज्यात कत्तलीकरीता घेवुन जात असताना आढळले. पोलिसांनी २ लाख ८० हजार रुपये किमतीचे २८ नग बैल, १५ लाख किमतीचा कंटेनर असा असा एकुण १७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करत आरोपी वसिम युनुस खान वय ३५ रा. बल्लारपुर, चालक जितीन केशु विजयन वय ३० रा. ईरूमतला जिल्हा येरणागुंडम (केरळ), मोबीन फकरुदीन शेख वय ३० वर्षे रा. लक्कडकोट यांचे विरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ) (१) (५), ९, ११ व प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड) अन्वये फिर्यादी नामे नायक पोलीस राहुल सहारे यांचे कायदेशीर फिर्यादवरून गुन्हा दाखल केला. 
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलिस हवालदार, दिवाकर पवार, राहुल सहारे, मलय्या नरगेवार, पोशि. स्वप्नील चांदेकर, विजय मुडे, सुरेन्द्र काळे, अतुल शहारे, प्रल्हाद जाधव चालक नरेश शेन्डे यांनी केली असुन पुढील तपास ठाणेदार राहुल चव्हाण करीत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top