- आय.एम.ए चंद्रपूर च्या डॉक्टरांना महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मिळाला पुरस्कार
- डॉ.स्नेहल पोटदुखे व डॉ.अपर्णा देवईकर "मेडिक्वीन एक्सलन्स" पुरस्काराने सन्मानित
- आय.एम.ए अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केले अभिनंदन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्यासाठी राज्याच्या विविध जिल्हयातील 28 महिला डॉक्टरांना राजभवन येथे मेडिक्वीन एक्सलन्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरच्या सदस्या डॉ.स्नेहल पोटदुखे व डॉ.अपर्णा देवईकर यांना हा पुरस्कार मिळाला असून त्यांचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून अभिनंदन केले असून असेच सामाजिक कार्य त्यांच्या हातून निरंतर घडत राहो असे त्यांनी सांगितले व पुढील सामाजिक व वैद्यकीय वाटचालीसाठी आय.एम.ए चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, सचिव डॉ. अनुप पालीवाल,डॉ.अभय राठोड,सल्लागार डॉ.कल्पना गुलवाडे, डॉ.किरण देशपांडे, डॉ.प्रमोद बांगडे,डॉ.नसरीन मवानी,माजी अध्यक्ष डॉ.अनिल माडुरवार, माजी सचिव डॉ.सुरभी मेहरा,उपाध्यक्ष किशोर धांडे,डॉ. सुधीर रेगुंडवार, डॉ.अतुल चिद्दरवार,डॉ.पल्लवी इंगळे,डॉ.सविता माडुरवार,कोषाध्यक्ष डॉ.प्रवीण पंत,डॉ.नरेंद्र कोलते,सहसचिव डॉ.करुणा रामटेके,डॉ.प्रीती चौहान,डॉ.प्रसन्न मद्दीवार,डॉ. आशिष वरखेडे,महिला आघाडी अध्यक्षा डॉ.मनीषा घाटे,सहप्रमुख डॉ.पल्लवी आलूरवार, सचिव डॉ.नागीना नायडू इत्यादी पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.