Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धनोजे कुणबी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनोजे कुणबी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमूळे खोलवर जात...
  • धनोजे कुणबी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमूळे खोलवर जातात, कष्ट करुण ज्यांनी शिक्षण घेतल ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय ठेवा, कष्टातून चांगला अनुभव मिळतो आपल्या जिवनातील स्वप्नांना कष्टाच बळ द्या यश निश्चित मिळणार असल्याचे आव्हान खासदार बाळु धानोरकर यांनी राजुरा येथे मार्गदर्शन करताना केले.
स्थानिक धनोजे कुणबी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार बाळ धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजुरा धनोजे कुणबी समाज समाजभवनाकरिता पंचेविस लक्ष रुपयाचा निधी मंजूर करीत असल्याची घोषणा करून समाज बांधवांना प्रोत्साहित केले.
या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून माजी आमदार अँड. वामनराव चटप, प्रमुख पाहुणे माजी आमदार सुदर्शन निमकर, अँड. संजय धोटे, अँड. पुरुषोत्तम सातपूते अध्यक्ष धनोजे कुणबी समाज मंडळ चंद्रपूर, अँड. मुर्लीधर देवाळकर, डॉ मारोतराव पिंळकर, अँड. सदानंद लांडे, उपस्थित होते. यावेळी सत्कारमुर्ती अनिरुध्द डाखरे, अर्पीत धोटे, कु मोहिनी ड्राहुले, कु ज्ञानदा धोटे, कु आचल ताजणे, प्रज्वल उरकुडे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात अँड. सातपुते, माजी आमदार चटप, निमकर व धोटे यांनी समाजाच्या प्रगतीच्या पाहूलखुंणांचा आलेख वाढत चालला असून भविष्यात धनोजे कुणबी समाजाचे अस्तित्व महाराष्ट्र सह देशाच्या नकाशावर फुलून दिसेल यासाठी भावी पिढीने अधिक मेहनत घेत यश संपादन करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील पहानपट्टे तर आभार केशवराव ठाकरे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष दौलतराव भोंगळे, सचिव देवराव निब्रड, सदस्य मनोज पावडे तथा समस्त धनोजे कुणबी समाज मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी परीश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top