- दालमियाच्या उपोषणकर्ते कंत्राटी कामगारांची प्रकृती ढासळल्याने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल
- उपोषण कर्त्याना बळजबरीने रुग्णालयात नेऊन आंदोलन दबाविण्याचे पोलिसांवर आरोप
- मनसे प्रणित मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सचिन भोयर यांच्या नेतृत्वाखाली सूरू आहे अन्न त्याग आंदोलन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
दालमिया सिमेंट कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सचिन भाऊ भोयर यांच्या नेतृत्वाखाली सूरू असलेल्या अन्न त्याग आंदोलन ला बसलेल्या 7 पैकी 5 कामगारांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पोलिसांकडून मंडपातून उचलुन उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात जाण्यास नकार दिल्यानंतरही पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
मागिल 10/11/2021 पासून नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीच्या गेट समोर महाधरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. दोन आठवडे उलटूनही जिल्हा प्रशासन व सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काहीच दखल नाहीं घेतली. याचा रोष व्यक्त करत दशरथ सुधाकर वडस्कर, अनिल दादा जी आत्राम, अशोक नीळकंठ कुचनकर, श्रीकांत तुळशीराम धानोरकर, नीळकंठ बाळकृष्ण लांडगे, राजेंद्र गुरनुले, विमलराव जगताप, जगतपाल तेजा ह्या सात पुरूष कामगारांनी मागील 23 नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. 3 दिवसाच्या उपोषणानंतर तीन कामगारांची प्रकृती खालावल्याने पोलीस प्रशासनाने 26/11/21 ला उपोषणाला बसलेल्या काही लोकांना दवाखान्यात दाखल करून घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, त्याला स्थानिक कंत्राटी कामगार व स्थानिक नागरिकांनी पाठिंबा देत जोरदार विरोध केला होता. हालचाल पोलीस उपोषणाला बसलेल्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसेचे स्थानिक नेते प्रकाश बोरकर यांनी केला होता.
उपोषण करण्याऱ्या कामगारांना बळजबरीने उचलुन आंदोलन संपण्याचा प्रयत्नाला कामगारांनी विरोध केला आहे. विरोध अजून संपलेला नाही असे म्हणत मंडपातून पोलीसांनी उचललेल्या उपोषणकर्ता कामगारांच्या पत्नींनी आता पुन्हा त्याचठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. पुर्वी मुरली सिमेंटच्या स्थायी व कंत्राटी कामगारांना कंपनीत सामावून घ्यावे, पुर्वी कंपनी कंत्राटदाराकडे कार्यरत कामगारांना कामावरून कमी करू नये, पुर्वी मुरली सिमेंटच्या स्थायी व अस्थायी कामगारांना वेजबोर्डनुसार पगार द्यावा, दत्तक गांवातील बेरोजगार युवकांना न्याय मिळावा अशी मागणी कामगारांनी रेटून धरली आहे. आता या आंदोलनाचे भविष्य काय होणार आणि आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्व कामगार, येथील कामगार संघटना आणि स्थानीय सोबतच संपुर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नारंडा सिमेंट कंपनीत 10/11/21 पेक्षा जुन्या स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे, सिमेंट कंपनीने ठरवून दिल्याप्रमाणे नोकरी द्यावी, अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मात्र स्थानिक प्रशासन व सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने गिरणीने 23/11 पासून बेमुदत उपोषण सुरू केले. आहेत, अशोक नीळकंठ कुचनकर, नीलकंठ बाळकृष्ण लांडगे, अशोक नीळकंठ कुचणकर, नीलकंठ बाळकृष्ण लांडगे आदींची माहिती घेतली. श्रीकांत तुळशीराम धानोरकर यांची प्रकृती ढासळल्याने पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेण्याच्या प्रयत्नाला विरोध करत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याची चर्चा आहे. प्रहारच्या या निर्णयामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी तोडगा काढण्याचा दबाव दालमिया प्रशासनावर वाढला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.