Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अवैध रेती उत्खनन ; २ ट्रॅक्टर जप्त जप्तीचे ट्रॅक्टर तिसऱ्यांदा सापडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अवैध रेती उत्खनन ; २ ट्रॅक्टर जप्त जप्तीचे ट्रॅक्टर तिसऱ्यांदा सापडले आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स  गोंडपिपरी - मागील वर्षीपासून रेती गटां...
  • अवैध रेती उत्खनन ; २ ट्रॅक्टर जप्त
  • जप्तीचे ट्रॅक्टर तिसऱ्यांदा सापडले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स 
गोंडपिपरी -
मागील वर्षीपासून रेती गटांचे लिलाव रखडल्याने अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांनी डोके वर काढले आहे. तालुक्यातील रेतितस्करीवर अंकुश लावण्यासाठी गोंडपिपरी मंडळाधिकारी सुर्वे यांनी धडक मोहीम हाती घेत सलग दुसरी कारवाई केली. अवैध उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर शनिवारी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील नांदगाव परिसरात पकडण्यात आले. सदर कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गोंडपिपरी तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे विपल प्रमाणात खनिज संपदा आहे. अशातच येथील रेती ही दर्जेदार असल्याने बांधकाम क्षेत्रात रेतीला मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून येथील रेती घाटाचे लिलाव रखडल्याने या संधीचा गैरफायदा घेत अवैध उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांनी डोकेवर काढले आहे. विविध रेती घाटांवर अवैध उत्खनन करण्याचा सपाटा सुरू केला होता. अशातच गोंडपिपरी मंडळ अधिकारी सुर्वे यांनी सापळा रचून गोपनीय माहितीच्या आधारे तालुक्यातील नांदगाव (घडोली ) नदी घाटवर अवैध उत्खनन होत असताना आपल्या चमूसह धाड घालून अवैध रेती उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले. सदर दोन्ही ट्रॅक्टरवर प्रादेशिक परिवहन विभागाचे रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेले नसून वाहन चालकाच्या सांगण्यानुसार सदर दोन्ही ट्रॅक्टर तालुक्यातील नांदगाव येथील माणुसमारे बंधू यांची असल्याची माहिती मंडळ अधिकारी सुर्वे यांनी दिली आहे. याप्रकरणी दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय प्रांगणात लावण्यात आले. पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर केल्याची माहिती सुर्वे यांनी दिली.

जप्तीचे ट्रॅक्टर तिसऱ्यांदा सापडले
मंडळ अधिकारी सुर्वे यांनी पकडलेले अवैध उत्खनन प्रकरणातील ट्रॅक्टर हे सलग तिसऱ्यांदा अवैध उत्खनन करतांना सापडले असून महसूल विभागाच्या अधिनियमानुसार दंडात्मक कारवाईत तिप्पट वाढ होणार काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
अवैध उत्खननाची माहिती द्यावी
तालक्यातील कठल्याही रेती घाटांवर अवैध उत्खनन सुरू असल्यास त्याची तत्काळ माहिती महसूल विभागाकडे पुरवून रात्रपाळीत चालणाऱ्या या गोरखधंद्यावर अंकुश लावण्यात नागरिकांनीसुद्धा सहकार्य करावे, असे आवाहन मंडळ अधिकारी सुर्वे यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top