Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत आर्थिक मदतीसाठी कलावंताकडून प्रस्ताव आमंत्रित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत आर्थिक मदतीसाठी कलावंताकडून प्रस्ताव आमंत्रित आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - जिल्ह्यातील प्रयोगात्मक क...
कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत आर्थिक मदतीसाठी कलावंताकडून प्रस्ताव आमंत्रित
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
जिल्ह्यातील प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलावंतांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने कोविड दिलासा पॅकेजअंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. इच्छुक कलाकारांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज पुढील दहा दिवसात संबंधीत तहसिलदार यांचेमार्फत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू होता. तसेच,लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहावे लागले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रमही या काळात स्थगित करण्यात आलेले होते. या काळात सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटीत व असंघटीत कलाप्रकारातील विविध कलाकार,ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असे आहे, त्यांची आर्थिक कुचंबना झाल्याने संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कला प्रकारातील कलाकारांना शासनाच्या वतीने एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातून घेतला आहे.
पात्र एकल लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील समितीने पात्र केलेल्या कलावंतांची यादी विहित तपशीलासह संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचेकडे सादर केल्यानंतर त्यांचेमार्फत पात्र लाभार्थांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करण्यात येणार आहे.

कोविड दिलासा पॅकेजसाठी एकल कलावंतांकरीता पात्रता निकष व अटी
राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण असणारे आर्थिकदृष्टया दुर्बल कलावंत अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांचे महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असावे,वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादेत असावे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही.

एकल कलावंताने अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-ब-1 नुसार विहित नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखलाही ग्राह्य राहील. तहसिलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, आधार कार्ड व बँक खाते तपशील, शिधापत्रिका सत्यप्रत अर्जासोबत जोडावी.

समुह लोककलापथकांचे चालक, मालक, निर्माते यांनी 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-ब-2 नुसार सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे अर्ज सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त एकल कलाकारांनी आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top