Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतक-यांनी विमा कंपनीला सुचित करावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतक-यांनी विमा कंपनीला सुचित करावे 72 तासांच्या आत नुकसानीबाबत सूचना देण्याचे कृषि...

  • अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतक-यांनी विमा कंपनीला सुचित करावे
  • 72 तासांच्या आत नुकसानीबाबत सूचना देण्याचे कृषि विभागामार्फत आवाहन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
दि. 29 डिसेंबर : राज्यात दि. 27 व 28 डिसेंबर रोजी काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस यामुळे खरीप हंगामातील उभ्या असलेल्या तूर, कापूस तर काही प्रमाणात काढणी झालेल्या तुरीचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामात विमा संरक्षित गहू, हरभरा, रब्बी ज्वारी यासारख्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत अधिसूचित महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत नुकसानीबाबत सूचना देणे आवश्यक असल्यामुळे याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपन्यांना द्यावी.
शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत सूचना देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय तसेच ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा आदी पर्यायांचा वापर करता येईल. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीकडे विहित कालमर्यादेत सादर करावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top