Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चोरांनी चक्क लोखंडी गेटच चोरून नेले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चोरांनी चक्क लोखंडी गेटच चोरून नेले मध्यरात्रीत शहराच्या मध्यभागात चोरांचा कारनामा विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - शहरातील ...

  • चोरांनी चक्क लोखंडी गेटच चोरून नेले
  • मध्यरात्रीत शहराच्या मध्यभागात चोरांचा कारनामा
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गडचांदूर रोड वरील अमराई वॉर्डातील एका खुल्या प्लॉटच्या वॉलकंपाउंडला असलेले लोखंडी गेटच अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना उघडीस आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार अमराई वॉर्डात रेकलवार यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या बाजूला त्यांचा प्लॉटही आहे त्या प्लॉटच्या वॉलकंपाऊंडला असलेला जवळपास ३०-३५ किलो वजनाचा लोखंडी गेटच अज्ञात चोरटयांनी बुधवारच्या रात्री चोरून नेला. सकाळी उठल्यावर रेकलवार याना वॉलकंपाऊंडला लागलेला लोखंडी गेटच गायब दिसला. सध्या ढगाळ वातावरणाने हवामानात थंडीचा गारवा वाढला असून नेमक्या याच संधीचा फायदा भामट्या चोरांनी उचलला असावा अशी चर्चा परिसरात सुरु असून पोलिसांनी रात्री गडचांदूर मार्गावर पोलीस गस्ती अधिक प्रमाणात वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top