Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वनविभागाची घरात झाडाझडती जिवंत कासव आणि वन्यप्राण्यांची हाडे गवसली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वनविभागाची घरात झाडाझडती जिवंत कासव आणि वन्यप्राण्यांची हाडे गवसली वनविभागाने केली बाप-लेकास अटक शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर ...

  • वनविभागाची घरात झाडाझडती
  • जिवंत कासव आणि वन्यप्राण्यांची हाडे गवसली
  • वनविभागाने केली बाप-लेकास अटक
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
घरात कासव ठेवणं बापलेकाला चांगलंच भोवलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने झाडाझडती घेतल्यानंतर घरात जिवंत कासव आणि वन्यप्राण्यांची हाडे पोलिसांना गवसली. वनविभागाने बाप-लेकास अटक केली आहे. मुरलीधर हरबाजी गायकवाड, अतुल मुरलीधर गायकवाड अशी बापलेक आरोपींची नावे आहेत. ही कारवाई सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या शिवणी येथे करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्याअंतर्गत येणाऱ्या शिवणी वनपरिक्षेत्रातील शिवणी येथील गायकवाड यांच्या घरात कासव असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. माहितीच्या आधारावर वनविभागाने घराची झाडाझडती घेतली असता, घरात जिवंत कासव आढळून आलं. सोबतच वन्यप्राण्यांचे हाडे आढळून आलीत. सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. तुपे, विकास तुमराम यांनी केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top