Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होणाऱ्या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याबाबत जानेवारीत बैठक घेणार – आ. सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होणाऱ्या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याबाबत जानेवारीत बैठक घेणार – आ. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर बचाव सं...
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होणाऱ्या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याबाबत जानेवारीत बैठक घेणार – आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्‍या पदाधिकाऱ्यां समवेत प्रदुषणाबाबत चर्चा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होणारे प्रदुषण व त्‍यामुळे नागरिकांच्‍या आरोग्‍यावर होणारे विपरित परिणाम ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याच्‍या दृष्‍टीने जानेवारी महिन्‍यात सर्व संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन उपाययोजनेची दिशा निश्चित करु, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दि. २५ डिसेंबर रोजी चंद्रपूर बचाव संघर्ष समिती चंद्रपूरचे पदाधिकारी व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्‍य अभियंता सपाटे यांच्‍या समवेत आ. मुनगंटीवार यांनी हिराई विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीत चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्‍या पदाधिका-यांनी प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याच्‍या दृष्‍टीने काही मागण्‍या केल्‍या. प्रामुख्‍याने ईएसपी चे अयोग्‍यकार्य आणि जुन्‍या मशिनीमुळे चिमण्‍यांमधून निघणारी राख तसेच धुर हवेत फेकली जाते, काळा धुर अर्थात कार्बन पार्टीकल ऑक्‍सीजन सोबत पुर्णरुपाने उपयोग न होण्‍यामुळे पार्टीकलची राख होत नाही यामुळे राख आणि धुराचे प्रमाण अधिक वाढते. ईएसपीला विज निर्मितीसोबत क्‍लब करण्‍याची आवश्‍यकता आहे. ईएसपीचे योग्‍य पध्‍दतीने मेंटेंनन्‍स होत नाही अशा विविध मागण्‍या समितीच्‍या पदाधिका-यांनी केल्‍या. प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले असुन चंद्रपूर हे देशातील सर्वाधीक प्रदुषीत शहरांमध्‍ये गणले जाते. त्‍यामुळे या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याची नितांत आवश्‍यकता असल्‍याचे समितीचे पदाधिकारी म्‍हणाले. आ. मुनगंटीवार यांनी समितीच्‍या पदाधिका-यांच्‍या मागण्‍या ऐकुन घेतल्‍या व या संदर्भात जिल्‍हाधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्‍य महाप्रबंधक यांची संयुक्‍त बैठक घेवुन उपाययोजना बाबत चर्चा करु असे आश्‍वासन समितीच्‍या पदाधिका-यांना दिले.
यावेळी डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. मंगेश गुलवाडे, विजय चंदावार, रामपाल सिंह, उमाकांत धांडे, प्रिती भुषणवार, डॉ. स्‍वपन दास, सुबोध कासुलकर आदींची उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top