Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर जिल्हाला घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत द्या - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उर्जामंत्री नितीन राऊत यांना मंचावरुन मागणी, उर्जामंत्री यांच्या हस्ते 33/11 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी च...




























  • उर्जामंत्री नितीन राऊत यांना मंचावरुन मागणी,
  • उर्जामंत्री यांच्या हस्ते 33/11 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
विज उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हाला घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी चंद्रपूरकरांची मागणी आहे. या मागणीचा मी सातत्याने पाठपूरावा करत आहे. मात्र या मागणीच्या पुर्ततेसाठी अपेक्षित असा प्रतिसाद संबंधीत विभागाकडून मिळत नसल्याने सदर मागणीसाठी भविष्यात चंद्रपूरात मोठे जनआंदोलन उभे राहू शकते त्यामूळे नागरिकांची असलेली ही मागणी मान्य करावी अशी मागणी मंचावरुन बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना केली आहे. याच कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही चंद्रपूर जिल्हाला किमान 100 युनिट मोफत देण्यात येईल अशी अपेक्षा उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून व्यक्त केली.
राजूरा, मुल, सावली, चंद्रपूर, आणि चिमूर तालुक्यातीली 33/11 केव्ही उपकेंद्राचे अभासी पध्दतीद्वारे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे,  आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनूले,  जिल्हा परिषदेच्या मूख्य कार्यकारी अभियंता मिताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे, महावितरनचे अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे आदींची मंचावर उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top