Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बैलबंडी मोटारसायकलच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बैलबंडी मोटारसायकलच्या धडकेत तरूणाचा मृत्यू राजुरा तालुक्यातील धिडशी येथील घटना आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - पेल्लोरा येथील आपल्य...




























  • बैलबंडी मोटारसायकलच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
  • राजुरा तालुक्यातील धिडशी येथील घटना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
पेल्लोरा येथील आपल्या शेतातून कापूस वेचून गोळा करून बैलबंडीने धिडसी येथे निघालेल्या एका शेतकऱ्याच्या बैलबंडी व मोटारसायकल मध्ये झालेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 21 च्या सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत नामदेव उरकुडे वय 26 हे आपल्या पेल्लोरा येथील शेतातून वेचलेल्या कापसाला बंडीवर भरून धिडशी कडे जात असतांना सायंकाळी 6.30 वाजताच्या समोरून येणाऱ्या एका मोटारसायकल क्र. MH34 AJ 6170 सोबत समोरून धडक झाली यात दुर्गापूर येथून कामावरून येत असताना राजुरा तालुक्यातील मारडा (लहान) येथील मोटारसायकलस्वार महेश अनिल पिंपळकर वय 21 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला.  मोटारसायकलस्वार महेशला बैलबंडी खालून लोकांनी काढले. या धडकेत एका बैल सुद्धा जखमी झाला. 
महेश पिंपळकर यांची शेती वेकोलिने अधिग्रहीत केल्याने नुकतेच वेकोलि मार्फत दुर्गापूर येथे त्यांचे नोकरी पूर्व एक महिन्याचे प्रशिक्षण (व्हिटीसी) सुरु होते. महेश हा एकुलता असून नुकतीच त्यांला वेकोलिमध्ये नोकरी लागली होती. दुर्गावर येथून प्रशिक्षण करून घरी येत असतांना धिडशी गावाबाहेर संतोष सपाट यांच्या गोठ्याजवळ शेतातून कापसाचे गाठोडे वाहून आणणाऱ्या बैलबंडीला जोरदार धडक दिली यात महेश हा जागीच मरण पावला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top