Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये भीषण आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आग विझवण्याचे काम सुरू असतानाच 10 जण दगावले आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स अहमदनगर - जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी स...


















































  • आग विझवण्याचे काम सुरू असतानाच 10 जण दगावले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
अहमदनगर -
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. आग लागली तेव्हा आयसीयूत जवळपास 20 जण होते. ही आग आटोक्यात आणेपर्यंत या विभागात उपचार घेत असलेले 10 रुग्ण दगावले आहेत. तसेच इतर काही रुग्ण भाजून जखमी झाले आहेत. गंभीर रुग्णांना आता पुण्यात हलवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात असलेला अतिदक्षता विभाग रुग्णालयाच्या अत्यंत मध्यभागी आहे. या विभागात जवळपास वीस रुग्णांवर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी या विभागात आग पसरल्याने एकच धावपळ उडाली. रुग्णालयातील अग्निशमन यंत्रनेचा वापर करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही.
त्यामुळे अहमदनगर महापालिका तसेच एमआयडीसी अग्निशमन विभागाची वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या वाहनांनी यावेळी लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी तसेच रुग्णालयाचे व्यवस्थापन अतिदक्षता विभागापर्यंत पोहोचले.
तोपर्यंत संपूर्ण अतिदक्षता विभाग आगीत भस्मसात झाला होता.प्राथमिक माहितीनुसार या आगीत 14 ते 15 रुग्ण भाजून गंभीर जखमी झाले. आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगीत मृत्यूमुखी पावलेल्यांची 9 नावे जणांची नावे समोर आली आहेत.
  • रामकिशन विठ्ठल खरपुडे
  • सीताराम दगडू जाधव
  • सत्यभामा शिवाजी घोडचौरे
  • कडूबाई गंगाधर खाटी
  • शिवाजी सदाशिव पवार
  • दीपक विश्वनाथ जेडगुळे
  • कोंडाबाई मधुकर कदम
  • आसाबाई नांगरे
  • बाबी अहमद सय्यद
​​​​​​​रुग्णालयातील बेजबाबदारपणाच्या 4 घटना
  1. महाराष्ट्रात यापूर्वी एप्रिलमध्ये मुंबईला लागून असलेल्या विरार पश्चिम येथे विजय वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागली होती. या घटनेत 13 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. रुग्णालयातील ICU मध्ये असलेल्या AC चा स्फोट झाल्यानंतर ही घटना घडली होती.
  2. जानेवारी 2021 मध्ये भंडारा जिल्ह्यात शासकीय रुग्णालयामध्ये लहान मुलांच्या आयसीयूत आग लागली होती. यामध्ये 10 नवजातांचा बळी गेला होता. वार्डमध्ये एकूण 17 चिमुकले होते, त्यातील 7 जणांना वाचवण्यात आले होते.
  3. मुंबईतील भांडूप परिसरात एका मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कोविड रुग्णालयात आग लागली होती. या घटनेत 10 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.
  4. नाशिकच्या सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे कोरोनावर उपचार घेणाऱ्यांचे ऑक्सिजन 30 मिनिटे बंद पडले होते. यातून 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top