Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ऐन दिवाळीच्या दिवशी विद्यार्थ्यांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वडगाव येथे स्वतःच्या शेतातील बंधाऱ्यातील गाळात पडल्याने मृत्यू  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - महात्मा गांधी विद्यालय, ...


















































  • वडगाव येथे स्वतःच्या शेतातील बंधाऱ्यातील गाळात पडल्याने मृत्यू 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, सोनूर्ली येथील लिपिक वामनराव सोनपितरे यांचा मुलगा आशीष वय 23 याचा ऐन दिवाळीच्या दिवशी वडगाव येथे स्वतःच्या शेतातील बंधाऱ्यातिल गाळात पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे सोनपितरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आशिष हा महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयचा माजी विद्यार्थी असून त्याने नुकताच चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात एम.एस.सी (फिजीक्स) प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. 4 नोव्हेंबर ला दुपारी 1 च्या दरम्यान शेतातील बंधाऱ्याच्या पाण्यात पाइप दुरुस्ती करताना पाय घसरला व पाण्यातील गाळात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला,ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री वडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, काका, काकू तथा बराच मोठा आप्तपरिवार आहे. आशीष गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ चे संचालक रामचंद्र सोनपितरे यांचा तो पुतण्या होता. आशिषच्या अकालीमृत्यू ने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top