राजुरा -
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व कायदेविषयक जनजागृतीचा कार्यक्रम राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा द्वारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले आणि या कार्यक्रमात राजुरा न्यायालयातील दोन्ही न्यायाधीशांच्या वतीने कायदेविषयक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
नागरिकांमधील कायदेविषयी संभ्रम आणि असमंजस स्थिती दूर करण्याविषयी माहिती या चर्चासत्रातून देण्यात आली यामध्ये मूलभूत कर्तव्ये, अधिकार, महिला कायद्याविषयी माहिती, बेटी बचाव बेटी पढाव, लिंग भेद, मालमत्ता विषयक खटले,परक्राम्यविलेख अधिनियम या विषयावरही जनजागृती साठी मार्गदर्शन करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख दिवानी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा प्राधिकरण एस.ए. देशपांडे, प्रमुख अतिथी सह.दिवानी न्यायाधीश व्ही.एस. कसबे हे होते, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड. निनाद येरणे अध्यक्ष तालुका बार असोसिएशन राजुरा, ॲड. अरुण धोटे ज्येष्ठ अधिवक्ता, ॲड.अर्पित धोटे, संस्थेचे सचिव अविनाश जाधव, संचालक श्री बियाबानी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ आर.आर. खेरानी हे होते. संचालन प्रा. गुरुदास बलकी तर आभार डॉ राजेंद्र मुद्दमवार यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.