- आ. सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वात होणार्या आंदोलनाची कंपनीला धास्ती!
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
भद्रावती तालुक्यातील बरांज येथे असलेल्या कर्नाटक-एम्टा कोळसा उत्खनन कंपनीने मनमर्जीचे धोरणसत्र राबवून स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.
याविरोधात येत्या १३ आक्टोंबरला भारतीय जनता पार्टीने राज्याचे माजी मंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन पुकारले आहे. त्या पाश्र्वभूमीवर आज भद्रावती येथिल लोकमान्य टिळक शाळेच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली.
बैठकी दरम्यान बोलताना, येत्या १३ तारखेला स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या रास्त न्यायमागण्यांसाठी भाजपतर्फे होणार्या या आंदोलनात जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित रहाणार असून या आंदोलनाचे नेतृत्व आ. सुधीर मुनगंटीवार करणार असल्याचे कळाल्याने कर्नाटक-एम्टा कंपनीची चांगलीच धडकी भरली आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र आणि नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी होण्यासाठी प्रकल्प ग्रस्थांबरोबरच स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कष्ट घ्यावे. अशा सूचना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बैठकीत केल्या. त्यानंतर जिल्हाध्यक्ष भोंगळे यांनी कार्यकर्त्यांसह खदान परीसराची पाहणी देखील केली.
पार पडलेल्या बैठकीत, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, पं.स. सभापती प्रविण ठेंगणे, तालुका महामंत्री नरेन्द्र जिवतोडे, जेष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार, शहराध्यक्ष किशोर गोवारदिवे, विजय वानखेडे, तुळशीराम श्रीरामे, नरेंद्र जिवतोडे, प्रविण सूर, यशवंत वाघ, अंकुश आगलावे, प्रविण सातपुते, प्रशांत डाखरे, सुनील नामोजवार, अफजलभाई, संजय वासेकर, अमित गुंडावार, सरपंचा मनीषा ठेंगणे, सरपंचा, कु. प्रभा गडपी, भाजयुमोचे अमित गुंडावार, इम्रान खान, आकाश वानखेडे, केतन शिंदे यांसह तालुक्यातून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.