राजूरा विभागीय कार्यालयात संचालकांचा सत्कार सोहळा उत्साहात
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजूरा (दि. २१ ऑगस्ट २०२५) -
राजूरा, कोरपना व जिवती तालुक्यातील सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे व्यवस्थापक व गट सचिव यांच्या वतीने 16 ऑगस्ट रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजूरा विभागीय कार्यालयातील सभागृहात नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माजी आमदार व संचालक सुदर्शन निमकर, संचालक विजयराव बावणे, संचालक प्रा. ललित मोटघरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गट सचिवांनी निदर्शनास आणलेल्या अडचणींबाबत बँक व्यवस्थापनाशी चर्चा करून सोडविली जातील, असे आश्वासन मान्यवरांनी दिले.
शेतकरी आणि बँक यांचा दुवा म्हणजे सोसायटी – सुदर्शन निमकर
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकरी आणि बँकेला जोडणारा खरा दुवा म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. गट सचिव व संस्थाध्यक्ष यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी संस्थेच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरु करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी बँक उभी राहावी – प्रा. ललित मोटघरे
संचालक प्रा. ललित मोटघरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शेतीचे अर्थशास्त्र समजून घेतल्याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रगतीला गती मिळणार नाही. त्यासाठी सोसायटी आणि बँकेने शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या प्रगतीवरच बँकेची समृद्धी – विजयराव बावणे
संचालक विजयराव बावणे यांनी शेतकरी आहे म्हणूनच बँक आहे, असे स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या प्रगतीवरच बँकेचा विकास आणि समृद्धी अवलंबून असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते पंढरीजी चने, विभागीय अधिकारी बि. एल. जोगी, वरुर संस्थेचे उपाध्यक्ष चेतन जयपूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक जगन दुर्गे यांनी सादर केले. संचालन जयंत गौरकार यांनी केले तर आभार गट सचिव लोढे यांनी मानले. यावेळी तिन्ही तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांचे व्यवस्थापक व गट सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#FarmersFirst #CooperativePower #RuralDevelopment #FarmersAndBanks #AgricultureSupport #RajuraEvents #CooperativeMovement #chandrapurmadhyavartisahkaribank #sudarshannimkar #vijayraobavane #lalitmotghare #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.