- मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह
चंद्रपूर -
मनसेचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांचा वाढदिवस मनसे पदाधिकारी व कार्यकर्तांनी सामाजिक उपक्रमातून मोठया उत्साहात साजरा केला. चंद्रपूर येथे मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता, प्रविण शेवते यांनी पुढाकार घेत किशोर भाऊंच्या वाढदिवशी कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता दिवसरात्र आपल्याला सेवा देणारे सफाई कामगार यांचा कोरोनायोद्धाचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
सचिन बाळस्कर तालूका उपाध्यक्ष चंद्रपूर, अनरोज रायपूरे, पुरूषोत्तम मेश्राम, प्रकाश आत्राम, धिरज साखरे यांच्या पुढाकाराने मनसे रुग्णमित्र क्रिष्णा गुप्ता यांच्या उपस्थीतीत दुर्गापूर येथील रुग्णालयात कोरोना महामारी पासून सुरक्षीत रहावे या निस्वार्थ हेतूने रुग्नांना व कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर व फळ वाटप करण्यात आले नंतर डेबु सावली वृद्धाश्रमात हस्ते वृद्धांना शाल व फळे देण्यात आली. यावेळी वेळेस वृद्धांचा आशीर्वाद किशोरला लाभला.
राजूरा येथे मनविसे तालूका अध्यक्ष गणेश पुसाम व सूरज भांबरे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करन्यात आले. त्याचबरोबर पोंभूर्णा तालूका मनसे पधाधिकाऱ्यांनी गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी मनसे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार व मनविसे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आशिष नैताम यांउपस्थित होते. त्यानंतर पोंभुर्णा येथे रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या सामाजीक उपक्रमानंतर सांयकाळी किशोर मडगुलवार यांच्या निवासस्थानी केक कापून मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते, मनसैनिक व आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साहात साजरा करन्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.