Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आमदार सुभाष धोटे यांच्या निधीतून कोरपना येथे श्री संत नगाजी सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संत नगाजी सभागृहाला 15 लाख रुपयाची निधी उपलब्ध करून देण्यात आला धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - कोरपना येथे श्री संत नगा...
  • संत नगाजी सभागृहाला 15 लाख रुपयाची निधी उपलब्ध करून देण्यात आला
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना येथे श्री संत नगाजी महाराज सभागृहाचे भूमिपूजन आमदार आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. वाढदिवसाच्या दिवशी नाभिक समाजाला आमदार सुभाष धोटे यांनी भेट दिली असून या पुढेही नाभिक समाजाच्या पाठिशी उभा राहिला असे आवाहन केले.
या कार्यक्रमात चंद्रपूर - वणी, आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षखाली घेण्यात आला. यावेळी भद्रावती विधानसभेच्या आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांचीही उपस्थिती होती. यांच्या उपस्थितीत आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून श्री संत नगाजी सभागृहाला 15 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या सभागृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज मान्यवराच्या हस्ते पार पडला. मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरचे संचालक विजयराव बावणे यांच्या सहकार्याने आणि नाभिक समाजाचा सतत पाठपुरावा करून आमदार निधीतून  सभागृहासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. यानंतरही नाभिक समाजाला कुठलीही मदत लागली तर खासदार निधीतून आपल्याला आमदार  आपल्या पाठीशी उभे राहतील अशी ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.
यावेळी उत्तमराव पेचे माजी जिल्हा परिषद सदस्य, रमेश रणदिवे माजी सभापती, सपना सुनील कावळे, हिरालाल खादिने  भारती सभापती कोरपना, नंदा बावणे माजी नगराध्यक्ष कोरपना, दिनेश एकवनकर महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, कवडु खोबरकर महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर, श्याम राजूरकर, बारा बलुतेदार  कोषाध्यक्ष जिल्हा चंद्रपूर, रमेश घुमे,  ज्योत्स्ना खोबरकर नगर परिषद सदस्य तसेच या कार्यक्रमास नाभिक समाजातील अर्चना घुमे,  संदीप हनुमंते, दिवाकर वडस्कर, रमेश जमदाडे, सूरज खोबरकर, पांडुरंग आंबुलकर, भारत पंदिलवार, सुरेश खोबरकर, अनिल खोबरकर, अमोल दुधकर, मारोती मांडवकर, गणेश नक्षिणे, भालेश चौधरी, गणेश ओबेकर, योगेश हणुमते, शंकर दुलकारवार, रविंद्र नामगीरवार सर, निरज वडस्कर, स्वप्नील पंदिलवार इत्यादी  कार्यकर्त्यांनी भुमिपुजणाच्या कार्यक्रमाला सहकार्य केले.















Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top