- शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक "बबन उरकुडे" यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना उतरली रस्त्यावर
राजुरा -
लखीमपूर येथे केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गाड्या चढवणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला राजुऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या शिवसेनेने रस्त्यावर उतरून भारत बंद ला पाठिंबा दर्शवला होता.
शिवसेनेचे विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात शहरात भव्य रॅली काढून व्यापाऱ्यांची दुकानें बंद करण्यात आली. राजुऱ्याच्या इतिहासात प्रथमतः बंदला इतका मोठा प्रतिसाद मिळताना दिसला.
याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश गंपावर, तालुका समन्वयक वासुदेव चापले, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, माजी शहर प्रमुख भुमन सल्लम, माजी संघटक नरसिंग मादर, रमेश पेटकर सरपंच सास्ती, युवासेना पदाधिकारी कुणाल कुडे, स्वप्नील मोहुर्ले, रोहित नलगे, बबलू चौहान आणि तालुक्यातील प्रत्येक गावचे शिवसेना शाखाप्रमुख, युवासेना शाखाप्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.