चंद्रपूर -
भारतबंदचे कारण समोर करुन अडत्यांनी काल पर्यंत 5 हजार 600 रुपये पर्यंत सुरु असलेला सोयाबिनचा भाव खाली पाडून आज 3 हजारावर आणला याची माहिती यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती गाठून येथील अडत्यांना वठणीवर आणले, त्यानतंर पून्हा शेतक-यांचे सोयाबिन 5 हजार रुपये प्रति क्लिंटल या दराने खरेदी करण्यात आला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक राशिद हुसेन, विलास सोमलवार, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, सलिम शेख, रुपेश कुंदोजवार यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
शासनाने २०२१-२२ करीता सोयाबिनला ३ हजार ९०० रुपये हमीभाव ठरवून दिला आहे. शनिवार पर्यंत ५ हजार ते ५ हजार ६०० रुपये या भावाने शेतक-यांकडून सोयाबिनची खरेदी केल्या जात होती. मात्र आज सोमवारी भारत बंद असल्याचे कारण समोर करत अडत्यांनी सोयाबीनचा भाव अक्षरश: हमी भवा पेक्षाही खाली पाडला. त्यामुळे शनिवार पर्यंत 5 हजार पेक्षा अधिक असलेला भाव आज सोमवारी 3 ते 3 हजार 500 रुपयांवर आला. या प्रकारामूळे शेतक-यांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला. याची माहिती शेतक-यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना दिली. त्यानंतर आ. जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना कृषी उत्पन्न बाजार समीती जाण्याच्या सुचना केल्या. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती गाठत येथील अधिकारी व पदाधिका-यांना जाब विचारत शेतक-यांना योग्य भाव न मिळाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला. यावेळी काही काळ येथे तणावही निर्माण झाला होता.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.