Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सीमेंट उद्योगातील ट्रांसपोर्ट कांट्रेक्टरच्या संपाला जाहिर पाठिंबा - शिवानी वडेट्टीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मागण्या त्वरित सोडवा अन्यथा विजयक्रान्ति कंत्राटी कामगार संघ रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत धनराजसिंह शेखावत - आमचा विद...
  • ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मागण्या त्वरित सोडवा अन्यथा विजयक्रान्ति कंत्राटी कामगार संघ रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
विजयक्रान्ति कंत्राटी कामगार संघाची अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार यांनी जिल्हातिल सीमेंट उद्योगातील ट्रांसपोर्ट कांट्रेक्टरच्या संपाला जाहिर पाठिंबा देण्याची घोषणा करत या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिले.
सीमेंट उद्योगातिल सीमेंट वाहतूक करणारे ट्रांसपोर्ट कॉन्ट्रेक्टर यांनी डीजल इंधनाचे वाढत्या किमती बघून, सीमेंट वाहतूकीचे भाडेवाढ करण्यात यावे. ह्यसाठी 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संप सुरु केला आहे. या संपाला विजयक्रान्ति कंत्राटी कामगार संघाचा बिनशर्त पाठिंबा दिला आहे. कोरोना काळात देश ठप्प पडला असताना देशभरातील कामगार वर्गाला काम देण्यासाठी व स्थलांतरीत मजूरांना तिथे काम देण्यासाठी सीमेंटची वाहतूक करून ह्याच ट्रांसपोर्ट कांट्रेक्टर ने देशहीताचे मौलिक कार्य केले आहे हे शासन प्रशासनाने विसरु नये. तेव्हा जिल्ह्यातील सीमेंट उद्योगाला शिवानी वडेट्टीवार यांनी अपील केली की रास्त मागण्या त्वरित सोडवाव्या अन्यथा विजयक्रान्ति कंत्राटी कामगार संघ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. तसेच सीमेंट उद्योग व ट्रांसपोर्ट कॉन्ट्रैक्टर यांचे दरम्यान सकारात्मक चर्चा घेण्यात यावी असे निवेदन केले. निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेटटीवार यांना देण्यात आली आहे.








Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top