आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 01 ऑगस्ट 2025) -
शहरातील के.डी. फूड जंक्शनच्या शेजारील गल्लीमध्ये एक व्यक्ती अवैधरीत्या धारदार व टोकदार तलवार बाळगून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर डीबी पथकाने तात्काळ धडक कारवाई करत आरोपीला रंगेहाथ अटक केली.
पोलीस उपनिरीक्षक भिष्मराज सोरते यांनी फिर्याद दिली की, दि. 01 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 03:30 वाजल्याच्या सुमारास राजुरा शहरातील के.डी. फूड जंक्शनच्या बाजूच्या गल्लीत संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका इसमावर नजर ठेवून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 84 सेंटीमीटर लांबीची लोखंडी धारदार तलवार मिळून आली. आरोपी मारोती शंकर तग्रपवार वय 32 वर्ष, रा. चुनाभट्टी वॉर्ड राजुरा याला पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली. या तलवारीची किंमत सुमारे 1000 रुपये इतकी असून सदर शस्त्र पोलिसांनी जप्त करून पोलीस स्टेशन राजुरा येथे अप. क्र. 352/2025, कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त केलेला मुद्देमाल पो. स्टे. राजुरा येथील मुद्देमाल मोहरर कडे जमा करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भिष्मराज सोरते, सफौ. किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा रामेश्वर चहारे, पो.शी. शफीक शेख, पो.शि. महेश बोलगोडवार, पो.शि. शरद राठोड, पो.शि. आनंद मोरे, पो.शि. बालाजी यामलवाड, पो.शि. अविनाश बांबोळे, पो.शि. राजीव दुबे यांनी केली. राजुरा पोलिसांनी केलेली ही कारवाई शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून अवैध शस्त्र धारण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले जात आहेत.
#RajuraPoliceAction #IllegalWeaponSeized #SwordSeizureRajura #PoliceRaidSuccess #ChandrapurCrimeUpdate #LawAndOrderRajura #WeaponsOffTheStreets #RajuraCrimeNews #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.