- आरोपी झाले फरार - आदिवासी महिला मारहाण प्रकरण
राजुरा -
राजुरा तालुक्यातील सोंडो येथील आदिवासी महिलेला शरीरसुखाची मागणी करून विरोध केल्यावर या महिलेला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अखेर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालच शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी चंद्रपूर पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन त्वरित कार्यवाहीची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे नेते आबीद अली, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके व आदिवासी विकास परिषदेचे महीपाल मडावी यांनी आरोपींवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. दरम्यान या महिलेला जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.