Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अस्तित्वहीन जादूटोण्यामुळे कायदा हातात घेऊ नका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मार्कंडा (कं) येथे अंनिसचे प्रबोधन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स आष्टी - जादूटोणा, करणी, तंत्र-मंत्र, भूत, भानामती याअंधश्रद्धाच्या तसेच बा...
  • मार्कंडा (कं) येथे अंनिसचे प्रबोधन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
आष्टी -
जादूटोणा, करणी, तंत्र-मंत्र, भूत, भानामती याअंधश्रद्धाच्या तसेच बाबा, देव्या, मांत्रिक यांच्या प्रभावात न येता शांततापूर्ण जीवन जगावे. विकास आणि आनंदी जीवनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरावी असे आवाहन अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आष्टी पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मार्कंडा (कं) येथे आयोजित जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती कार्यक्रमात गावकऱ्यांना करण्यात आले.
आष्टी पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित सदर प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी विविध अंधश्रद्धांवर चमत्कार भंडफोड प्रात्यक्षिकांसह प्रकाश टाकला तर पोलिस निरीक्षक कुमार सिंह राठोड यांनी जादूटोणाविरोधी कायद्यातील तरतुदींसह गावकऱ्यांशी संवाद साधला आणि अंधश्रद्धामुळे परिसरातील शांतता भंग न करण्याचे आवाहन केले. गावात जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती पत्रके ही वितरीत करण्यात आली.
कार्यक्रमात पोलिस उपनिरीक्षक सौ. कांबळे, सरपंच वनश्री चाफले, मुख्याध्यापक बी. टी. घोडाम, माजी सरपंच गंगाधर पोटवार, ग्रामपंचायत सदस्य यांचीपण  उपस्थिती होती. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त  प्रतिसादात संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आष्टी पोलिस ठाण्याचे अधिकारी,  कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top