Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्थानिक ट्रक चालकांना काम दया या मागणी करिता यंग चांदा ब्रिगेडच्या ट्रक - चालक मालक ट्रांसपोर्ट युनियनचे काम बंद आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आज आंदोलनाचा दुसरा दिवस शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - वेकोलि मध्ये स्थानिक पल्ला गाडी चालक मालकांना डावलून परप्रांतीय ट्रक मा...
  • आज आंदोलनाचा दुसरा दिवस
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
वेकोलि मध्ये स्थानिक पल्ला गाडी चालक मालकांना डावलून परप्रांतीय ट्रक मालकांना कोळसा वाहतूकीचे काम दिल्या जात आहे. त्यामूळे या विरोधात आता यंग चांदा ब्रिगेडच्या ट्रक - चालक मालक ट्रांसपोर्ट युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून आज युनियनच्या वतीने नायगाव कोळसा खानिच्या चेकपोस्ट जवळ धरणे आंदोलन केले.
यावेळी युनियचे अध्यक्ष सय्यद अबरार, राजिव शेख, मोसीम खान, सलीम शेख, बबलू सिध्दीकी, सोहेल शेख, सानू शेख, कलीम खान, मोहम्मद हनिब शेख, सुनिल यादव, मुन्ना खान, इब्राईम खान, अकबर शेख, राहूल यदवंशी, उमेश गुप्ता, सुनिल चिल्का आदिंची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रवीश सिंह यांची आंदोलनाला भेट देत आपला पांठिबा दिला आहे.
जिल्ह्यात कोळशाच्या वाहतुकीसाठी योग्य अशा सर्व प्रकारच्या ट्रक आणि मशनरींची उपलब्धता आहे. असे असतानाही वेकोली प्रशासन तर्फे  खाजगी कंपनी आणि कंत्राटदारांना कोळसा वाहतूकीचे कामे  दिले जाते. सदर कंपणी आणि कंत्राटदार स्थानिक ट्रक चालकांकडे दुर्लक्ष करून इतर प्रांत, जिल्हा आणि राज्यातील ट्रक चालकांना कोळसा मालवाहतूकीचे काम देतात. यामुळे स्थानिक ट्रक चालकांना येथे काम मिळवणे कठीण होत आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामूळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यातच आता वेकोलि अंतर्गत मिळणा-या कामांवरही परप्रांतीयांनी डल्ला मारल्याने स्थानिक ट्रक चालकांपूढे मोठे आर्थिक संकट उभे झाले आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top