- आई-वडिलांच्या नजरेसमोर चिमुकला ठार
- राजुरा - गोवरी मार्गावर अपघात
राजुरा -
रामपूर-माथरा रोडवरील वळणावर सायंकाळी 6 वाजता झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात चिण्णा महेंद्र चिटलावार वय 8 महिने व संदीप सुधाकर काटवले वय 28 यांचा मृत्यू झाला तर महेंद्र चिटलावार वय 31 व अल्का चिटलावार वय 24 जखमी झाल्या असून जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रात्री उशिरा महेंद्र चिटलावार यांना उपचाराकरिता नागपूरला पाठविण्यात आले.
गोयेगाव येथे वेकोलित मजुरीचे काम करणारा महेंद्र चिटलावार हा पत्नी अल्कासह आपल्या आठ महिन्याचा मुलाला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान मोटारसायकल क्रमांक MH 34 BM 6424 ने राजुऱ्याकडे दवाखान्यात येत असताना विरुद्ध दिशेने राजुरा कडून साखरीकडे येणाऱ्या संदीप सुधाकर काटवले वय 30 रा. साखरी हे आपल्या मोटारसायकल क्रमांक MH 34 AX 5668 ने राजूराहून साखरीकडे जात असतांना यांची रामपूर-माथरा वळणावर दोन्ही मोटार सायकलची जोरदार धडक झाली यात महेंद्र चिटलावार यांचा आठ महिन्याचा मुलगा चिण्णा हा जागीच ठार झाला तर संदीप काटवले हा दवाखान्यात उपचाराकरिता आणत असताना मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.