Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शिक्षक दिन उत्साहात साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गुरुकुल महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्य वृक्षारोपण धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - नांदा गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान...
  • गुरुकुल महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्य वृक्षारोपण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नांदा गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्य परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशिय मंडळाचे सचिव, प्रभु रामचंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मुसळे, महाविद्यालय प्रभारी प्राचार्य प्रा. आशिष पईनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, डॉ. राजेश डोंगरे, प्रा. सचिन कर्णेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. अनिल मुसळे यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम संचालन डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन कर्णेवार यांनी केले. यानंतर शिक्षक दिनाचे औचित्य साधुन गुरूकुल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे वृक्षारोपणाच्या आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सुशांत खिरटकर, संतोष चौधरी, शालीक कांबळे, अनिल कोसरे, ननिता बुरहान, प्रशांत नवले व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top