Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: डालमिया भारत फाउंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा यांच्या विद्यमाने
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अंतरगाव येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - डालमिया भारत फाऊंडेशन व प्राथमीक आरोग्य केंद्र कवठाळा य...
  • अंतरगाव येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
डालमिया भारत फाऊंडेशन व प्राथमीक आरोग्य केंद्र कवठाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरगाव येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. शिबिरात 
बिपी, कॅन्सर, शुगर तपासणी या सारख्या रोगांची तपासणी करण्यात आली. गावातील तब्बल 114 लोकांनी या शिबिरात तपासणी करून घेतली व शिबीर आयोजित केल्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराची सांगता छोटेखाणी कार्यक्रम घेऊन शीबिराला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित अंतरगाव येथील सरपंचा सौ. पोडे मॅडम व उपसरपंचा सौ. पिंपळशेंडे मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा येथील आरोग्य अधिकारी डॉ. बावणे, टाटा ट्रस्टचे डॉ. तुषार रामटेके, डॉ. सूरज सालोंके, दिव्या पार्शिव अंतरगाव उपकेंद्राच्या सीएचओ कु. पूजा दांडेकर, डालमिया तर्फे प्रशांत भिमनवार, डॉ. प्रशांत खिरटकर, कुंडलीकजी देवगडे व गौरव वांढरे, लक्ष्मण कुडमेथे उपस्थित होते. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top