Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: घुग्घुस नगरपरिषदेला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उच्चस्तरीय चौकशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भाजपचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही - विवेक बोढे आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - आज ...
  • उच्चस्तरीय चौकशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भाजपचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही - विवेक बोढे
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
आज सकाळच्या सुमारास घुग्घुस नगरपरिषदेच्या गोडाऊनला आग लागली. या आगीत नगरपरिषदेच्या मालकीचे अनेक साहित्य जळाले. नगरपरिषदेमध्ये सिसिटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. रात्रपाळीत कर्मचारी नियुत्क केलेले आहेत. मग हि आग नेमकी कशामुळे लागली याची उच्चस्तरित चौकशी होणे अत्यंत आवश्यकता आहे. जोपर्यंत सखोल चौकशी होणार नाही तोपर्यंत भाजपचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिक्रिया विवेक बोढे यांनी दिली. 
या प्रसंगी माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, अमोल थेरे, रत्नेश सिंह, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, रज्जाक शेख, पांडुरंग थेरे, विनोद जिंजर्ला, कोमल ठाकरे, नितीन कटारे, सतीश कामातवार, दशरथ कांबळे तथा अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top