Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी बियाणे नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी - आबिद अली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बोंड अळी, लाल्यारोगाने शेतकऱ्यांवर संकट शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - चालू हंगामात कापूस व सोयाबीनचे उत्पादन चांगले येईल या...
  • बोंड अळी, लाल्यारोगाने शेतकऱ्यांवर संकट
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
चालू हंगामात कापूस व सोयाबीनचे उत्पादन चांगले येईल या आशेने बळीराजा सतत गेल्या चार वर्षापासून अतिवृष्टी बोंड अळी रोगाने संकट झेलत असताना यावर्षी आर्थिक संकट असतानाही कर्ज उभारून मोठ्या आशेने या पिकाची लागवड केली. ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेल्या जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन व कापूस पिकाची नासाडी झाली. त्यातच आता लाल्यारोग व बोंड अळीचा प्रकोप वाढल्याने शेतकरी ताटात आलेला घास ही रवल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये अतिवृष्टी जोरदार पावसाने झोडपून काढले तर विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीन हे पीक चांगल्या परस्थितीत असताना झालेल्या पावसामुळे लाल्या व बोंड अळीने कहर केल्यामुळे शेतकरी चिंतातूर अवस्थेत आहेत. शासनाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात केली मात्र विदर्भातील अनेक कापूस पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी बियाणे नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी केली आहे.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top