Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खड्ड्यांवरून जनक्षोभ! गडचांदूर रोड वर खड्यामुळे दुचाकीस्वारांचे दररोज तुटत आहे लचके
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुचाकीस्वार पडल्यानंतर मार्गावर जमा झालेली भीड  आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजूराच्या गडचांदूर रोड वर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झ...
दुचाकीस्वार पडल्यानंतर मार्गावर जमा झालेली भीड 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजूराच्या गडचांदूर रोड वर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचून हे खड्डे दुचाकीस्वारांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालक बेजार झाले आहे. दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन जा-ये करावी लागत आहे. खाड्याच्या नेमका नेम चुकला तर या खड्यात दररोज दुचाकीस्वार पडत असून त्यांचे लचके तुटत आहे. गडचांदूर मार्गावरील इंदिरा शाळेजवळील खड्यांची काही महिन्यापूर्वी थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पुन्हा पाऊस आला की चेहर्‍याचा मेकअप उतरावा तशी परिस्थिती पुन्हा या महामार्गाची झाली आहे. खड्डयांत आदळत आपटत वाट काढत खड्डयांतून लोकांचा प्रवास सुरुच आहे. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा किमान खड्डे तरी नीट व्यवस्थित बुझवा अशी मागणी या मार्गावरील व्यापारी, नागरिकांनी केली आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top