Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रा.दिनेश दुर्योधन यांना आचार्य पदवी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा येथील अँड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत रसायनशास्त्र विषयाचे प्रा. दिनेश दिवाकर ...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा येथील अँड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत रसायनशास्त्र विषयाचे प्रा. दिनेश दिवाकर दुर्योधन यांना आचार्य (पी.एच.डी) पदवी गोंडवाना विद्यापीठातून प्राप्त झाली. त्यांचे संशोधनाचा विषय "सिन्थेसिस अँड कॉरेक्टरीझेशन ऑफ व्हॅल्यूअबल मटेरिअल्स फ्रॉम राईस हस्क" हा होता. त्यांना संशोधनात प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु, ताई गोलवलकर महाविद्यालय, रामटेक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. डॉ. राजीव वेगिनवार यांचे सहकार्य मिळाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर धोटे, उपाध्यक्ष माजी आमदार ऍड.संजय धोटे,  कोषाध्यक्ष सतीश धोटे, सचिव डॉ.अर्पित धोटे , संचालक मोहन धोटे, डॉ. अश्विनी बलकी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशात कुटुंबीयांचे व मित्रांचे सहकार्य लाभले असे प्रा.दिनेश दुर्योधन म्हणतात. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top