Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांनी शाळेंना संगणक संच द्यावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्य...
  • जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पदवीधर आमदार अँड. अभिजीत वंजारी यांची नागपूर येथे भेट घेतली. मुख्याध्यापकांना कोरोना काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्या सर्व समस्या वंजारी यांच्या समोर मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कथन केल्या व त्याबाबतचे निवेदन देण्यात आले. आमदार. अभिजित वंजारी यांनी समस्या जाणूनघेत शासनस्तरावर मांडुन नक्कीच मार्गी लावू असे आश्वासन मुख्याध्यापक संघाला दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना आमदार निधीतून संगणक तथा प्रिंटर देण्याचीही मागणी करण्यात आली ती त्यांनी लगेच मान्य केली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष मारोतराव खेडीकर, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मधुकर चापले, कोषाध्यक्ष अरविंद राऊत तथा सहसचिव दिपक बोकडे उपस्थित होते. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top