- दरवर्षी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत 'पोषण मास' होतो साजरा
गडचांदूर -
नांदा सर्कल येथील आंगणवाडीत पोषण आहार अभियान अंतर्गत जन जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षा ग्रांपं सदस्य नंदाताई खडसे आणि आंगणवाडी पर्यवेक्षक सौ. मीनाताई परचाके यांच्या उपस्थित घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सेवा सुविधा बालविकास प्रकल्प कार्यालय, कोरपनाआंगणवाडीत विविध अंगणवाड्यांमध्ये शासनाच्या उपलब्ध सोयी सुविधा बाबत सदर कालावधीत जनजागृती करण्यात येत असते. अध्यक्षीय भाषणात नंदाताई खडसे यांनी बालक, गरोदर स्त्रीया व स्तनदा मातांच्या संपूर्ण पोषणाची जबाबदारी स्वीकारली असून कुणालाही पोषण आहारातून वंचित ठेवले जाणार नाही अशी माहिती दिली. कोरोनाकाळात अंगणवाड्या बंद असतानासुद्धा लाभार्थ्यांना घरपोच सुविधा पुरविल्या बद्दल सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमामध्ये विविध पोषक आहारांचे प्रदर्शन आणि त्यांना बनवण्याची पाककृती उपस्थित महिलांना समजावुन सांगण्यात आली. यानंतर घोषवाक्य तयार करून, "सही पोषण, देश रोशन" हे घोषवाक्य देत रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाला नांदा सर्कलची सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, गरोदर माता, स्तनदा माता, गावातील अनेक महिला आणि मुलं उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. सुषमा खिरटकर तथा आभार प्रदर्शन आंगणवाडी सेविका माधुरी भंडारकर यांनी केले.









टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.