Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गोरगरिबांचा विश्वास आणि भारतमातेचा आशिर्वाद हाचं मोदीचा ऊर्जास्त्रोत - देवराव भोंगळे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 571 रुग्णांना चष्मे वितरण  घुग्घुस भाजपतर्फे सेवा व समर्पण सप्ताहास प्रारंभ पंकज रामटेके - आमचा विदर्...
  • पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 571 रुग्णांना चष्मे वितरण 
  • घुग्घुस भाजपतर्फे सेवा व समर्पण सप्ताहास प्रारंभ
पंकज रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
घुग्घुस - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने जनसेवेच्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते येथील प्रयास सभागृहात आज संपन्न झाले. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हा सप्ताह सेवा व समर्पण सप्ताह म्हणून जनसेवेच्या विविध कार्यक्रमांनी येथे साजरा होत आहे.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की मोदी हे नाव आता केवळ भारतापुरते राहीले नाही तर आपल्यासारख्या गोरगरिब जनतेच्या आशिर्वादाने मोदी जागतिक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. नेहमी भारताच्या विकासाचा आणि देशातील गोरगरिबांच्या उन्नतीचा विचार घेऊन कार्य करणारे मोदी देशातील पहिलेच पंतप्रधान आहेत. असे आज गर्वाने म्हणावे वाटते. मोदींनी अशक्य ते शक्य असे अनेक मोठी निर्णय देश हितासाठी केले. देशातील गोरगरिब जनता विकासाच्या प्रवाहात यावी, यासाठी मोफत उज्ज्वला गॅस, प्रधानमंत्री आवास, घरोघरी शौचालय, किसान विमा, किसान सन्मान योजना, मुद्रा लोन, आयुष्यमान भारत, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या शेकडो लोककल्याणकारी योजनांसह अनेक वर्षे प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी रास्त समाधान शोधले, लोकहितात मोठे निर्णय घेतले. आज देशात असे कुठलेच क्षेत्र नाही ज्याच्या उन्नतीसाठी मोदी सरकारने काही केले नसेल. मोदींनी देशातील सैन्यांसह सीमेवर दिवाळी साजरी केली. देशाचे सैन्यबळ अद्ययावत करून भारतीय सैन्याचे मनोबल वाढविले. इतकेच नव्हे तर शत्रुराष्ट्रांनाही भारताच्या नावाने धडकी भरविण्याचे कामही मोदीं केले. 
घुग्घुस येथे नागरिकांसाठी आजपासून अनेक सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यात, ५७१ रुग्णांना चष्मेवाटप करण्यात आले, २७१ जेष्ठ नागरिकांना काठीचे वाटप,  ७१ लाभार्थ्यांना नविन राशन कार्डचे वितरण, तसेच १७१ मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया, तर जनधन योजनेच्या ७१ लाभार्थ्यांना पासबूक खात्याचे वितरण, यासोबतच शहरातील ७१ फेरीवाल्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप, ७१ गरजू नागरिकांना ब्लॅन्केटचे वाटप, ७१ गोरगरिबांना अन्नधान्य किट, शहरातील ७१ कोरोणा योद्ध्यांचा सत्कार व सन्मान, ७१ बचत गटांसाठी कर्ज मेळावा अशा विविध कार्यक्रमांचे  आयोजन सेवा व समर्पण सप्ताहात करण्यात आले असून  आज या सप्ताहाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी मंचावर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरे, माजी जि. प. सभापती नीतू चौधरी, प.स. माजी सभापती निरीक्षण तांड्रा, विजय आगरे, घुगुस भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार,  नकोडा सरपंच किरन बांदूरकर, मंगेश राजगडकर, पुनम शंकर, रत्नेश सिंह, मल्लेश बल्ला, मधुकर मालेकर, सुनील राम,  महेश लट्टा, पूजाताई दुर्गम,  नंदाताई कांबळे, पारस पिंपळकर, ऋषी कोवे, राजेश मोरपाका, लक्ष्मण कलवल, संजय भोंगळे, वैशालीताई ढवस,  प्रवीण सोदारी, अजय आमटे, स्वप्नील इंगोले, मधुकर मालेकर,  विवेक तिवारी, राजू डाकुर, इम्तियाज रज्जाक, अनंता बहादे, विनोद जांजरला, सुनिता पाटील, गणपत चौधरी, खलिल अहमद, भारत साळवे,  कोमल ठाकरे, राजेंद्र लुटे, सीनु कोत्तूर, मानस सिंह, अतुल चोखंद्रे, रज्जाक शेख, वामशी महाकाली, चंद्रकला मन्ने, मुकेश कामतवार, सुशील डांगे आदींसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, लाभार्थी तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top