Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ब्रेकिंग न्यूज - घुग्घुस येथील नगर परिषदेच्या गोदामाला आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महत्वपूर्ण कागदपत्रे जळाली आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स  घुग्घुस - घुग्घुस नगर परिषदेच्या विद्युत साहित्याचे खरडे व ग्रामपंचायतचे जुने दप्...
  • महत्वपूर्ण कागदपत्रे जळाली
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स 
घुग्घुस -
घुग्घुस नगर परिषदेच्या विद्युत साहित्याचे खरडे व ग्रामपंचायतचे जुने दप्तर ठेवलेल्या गोदामाला आज सकाळी 5 वाजताच्या दरम्यान आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच एसीसी कंपनीच्या अग्निशमन दलास बोलावून आग विझविण्यात आली.
घुग्घुस नगर परिषदेच्या गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नागरिकांमध्ये तर्क वितर्क लावल्या जात आहे. नगर परिषेदेच्या गोदामाला आग लागल्याची माहिती होताच जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घटनास्थळाला भेट दिली. नगर परिषेदेचे कर्मचारी हरि जोगी, विठोबा झाडे, सुरज जंगम व ईतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एसीसी कंपनीच्या अग्निशमन दलाचे इन्चार्ज जोंगीदर व त्यांच्या चमुनी आग विझविण्यात यश मिळविले व नगर परिषेदेच्या कर्मचाऱ्यांनी गोदामाला आग लागल्याची माहिती तहसीलदार निलेश गौड व मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना दिली. गोदामास आग लागल्याने घटनास्थळी बाजारातील दुकानदार व नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top