शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी शोध मोहीम तीव्र करा – नितीन मत्ते
चंद्रपूर जिल्ह्यात विशेष मोहिमेची गरज
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
वरोरा / चंद्रपूर (दि. ०७ ऑगस्ट २०२५) -
केंद्र व राज्य शासनाच्या ‘सर्व शिक्षा अभियान’ अंतर्गत सात वर्षावरील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेला चंद्रपूर जिल्ह्यात गती द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक प्रगतीसाठी ओळखला जातो. जिल्ह्यात चार वीज निर्मिती केंद्रे, मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी, सिमेंट व लोहप्रक्रिया उद्योग, फलोराईड खाणी असे विविध कारखाने कार्यरत आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या बहुतांश मजुरांमध्ये परप्रांतीय मजुरांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या पाल्यांची शाळेत नियमित उपस्थिती नसल्यामुळे ही मुले शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या श्रेणीत येतात.
नितीन मत्ते यांनी निवेदनात नमूद केले आहे की, रस्त्यांवर भिक्षा मागणारी मुले, कचरा वेचक, घासलेट, धार लावणारे कुटुंबातील मुले, तसेच विविध सिग्नलवर दिसणारी भटक्या प्रवृत्तीची मुले अनेकदा शाळेत नावनोंदणी केलेली असली तरी उपस्थितीत मात्र ते शून्य असते. यामुळे ही मुले केवळ नावापुरती शाळेत दाखल असल्याचे दिसते.
नितीन मत्ते यांनी शिक्षण विभागावर दुर्लक्षाचा आरोप करत म्हटले की, केंद्र व राज्य शासनाने शिक्षण हे प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे. त्यानुसार शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी कायदा अस्तित्वात असतानाही, जिल्हा शिक्षण विभागाकडून अशा विद्यार्थ्यांची शोध मोहीम प्रभावीपणे राबवली जात नाही.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी तालुकाप्रमुख श्रीकांत खगार, भद्रावती तालुका संघटक सुरज शहा, सुमित हस्तक, भद्रावती उपशहर प्रमुख मनीष बुचे, अविनाश उके आदी शिवसैनिक उपस्थित होते.
#RightToEducation #OutOfSchoolChildren #ChildEducationFirst #ChandrapurNews #EducationMatters #SenaForStudents #EveryChildInSchool #StopChildLabour #ShivSenaInitiative #RTEActIndia #nitinmatte #shivsena #SchoolEducationMinisterDadasahebBhuse #DadasahebBhuse #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.