स्तनपान जनजागृतीसाठी स्त्रीरोग तज्ञांचा स्तुत्य उपक्रम
स्तनपानाचे पहिले पाऊल – चंद्रपूरमध्ये जनजागृती उपक्रम
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०७ ऑगस्ट २०२५) -
स्तनपानाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक फायदे अधोरेखित करण्यासाठी आणि नवमातांमध्ये योग्य माहिती व जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने स्त्री रोग व प्रसूती रोग तज्ञ संघटना, चंद्रपूर शाखेतर्फे "स्तनपान सप्ताह" अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथील प्रसूती पश्चात वार्डात पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ. मंगेश गुलवाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उपक्रमाचे नेतृत्व अध्यक्ष डॉ. कल्पना गुलवाडे, सचिव डॉ. ऋचा पोडे आणि कोषाध्यक्ष डॉ. श्वेता मानवटकर यांनी केले.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या डॉ. कीर्ती साने यांनी स्तनपानाचे बाळ आणि आई दोघांवर होणारे सकारात्मक परिणाम विशद केले. त्यांनी स्तनपानाचे पोषणमूल्य, बाळाच्या प्रतिकारशक्तीवर होणारा परिणाम, आईच्या आरोग्यावर होणारे फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. मनीषा घाटे, डॉ. पूनम नगराळे, डॉ. शुभांगी वासाडे, डॉ. शितल सोनारकर, निवासी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफनेही सक्रिय सहभाग घेत नवमातांना मार्गदर्शन केले. प्रत्येक मातेला स्तनपानासंदर्भात संपूर्ण माहिती, योग्य पद्धती, काळजी व आरोग्यदायी सल्ला देण्यात आला. उपस्थित मातांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरेही देण्यात आली.
स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण असून, बाळाच्या पोषणासाठी सर्वोत्तम आणि नैसर्गिक पर्याय आहे, हे या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान स्तनदा मातांना पौष्टिक राजगिरा लाडू व आहार वाटप करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. कल्पना गुलवाडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन कोषाध्यक्ष डॉ. श्वेता मानवटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिस्टर निकिता लभाने यांनी अतिशय सुरेख पद्धतीने पार पाडले.
#BreastfeedingAwareness #HealthyMothersHealthyBabies #BreastfeedingWeek2025 #SupportNewMothers #NutritionForBabies #FirstVaccineIsBreastmilk #EmpowerThroughKnowledge #MaternalHealthMatters #ChandrapurCares #MedicalAwarenessWeek #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur #drmangeshgulwade #drkalpanagulwade #Breastfeedingawareness #DrKirtiSane #DrMilindKamble #IMA #indianmedicalassosiation #DrShwetaManvatkar
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.