Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर शहर काँग्रेस च्या महासचिवपदी कय्युम खान तर तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी अहमद यांची नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - गडचांदूर शहर कॉग्रेस च्या महासचिव पदी काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते व पत्रकार कय्युम खान ...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर शहर कॉग्रेस च्या महासचिव पदी काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते व पत्रकार कय्युम खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार सुभाष धोटे यांनी मंगळवारी नियुक्ती पत्र दिले. तसेच तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी अहमद यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शहर अल्पसंख्याक अध्यक्षपदी अनिस कुरेशी व राजुरा विधानसभा युवक महासचिवपदी प्रीतम सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे, तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्षा सविता टेकाम, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, शहर अध्यक्ष संतोष महाडोळे, गटनेते विक्रम येरणे, प्रा. आशिष देरकर, उपसरपंच उमेश राजूरकर, शैलेश लोखंडे, सय्यद मकसूद अली तथा इतर काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. कय्युम खान यांनी नियुक्ती बद्द्ल आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहे. अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कय्युम खान यांचे अभिनंदन केले जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top