Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भरधाव कार मंदिराचा चबुतऱ्याला आदळली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोलि कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू सास्ती ओपेनकास्ट आरसी जवळील घटना आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - सास्ती कडून जाताना सास्ती ओपेनक...
  • वेकोलि कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
  • सास्ती ओपेनकास्ट आरसी जवळील घटना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
सास्ती कडून जाताना सास्ती ओपेनकास्ट माईनच्या गेट व सर्वोदय विद्यालयासमोरील गेट समोरील कालीमाता मंदिर ला भरधाव वेगात येणारी अनियन्त्रित कार आदळल्याने कार चालक वेकोलि कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. 
मिळालेल्या माहितीप्रमाणे सास्ती ओपनकास्ट मध्ये चालक पदावर कार्यरत असलेलं सुरेश खडसे वय 59 हे आपल्या कार क्रमांक MH34 BV1245 ने सास्ती येथून जात असतांना सास्ती ओपेनकास्ट आरसी जवळ असलेल्या कालीमाता मंदिराच्या तारेच्या कंपाऊंडला तोडून गणपतीच्या चबुतर्‍याला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की या रस्त्यावरील तीन दुचाकी गाड्या व शेडची मोडतोड झाली. जखमी कामगाराला तातडीने वेकोलि क्षेत्रीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सुरेश खडसे हे तीन महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली व आप्तपरिवार आहे. या दुर्दैवी घटनेने कामगार क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top