Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटे यांनी जिवती येथे घेतली आढावा बैठक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स जिवती - जिवती येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वितरण व्यवस्...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
जिवती -
जिवती येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वितरण व्यवस्था, दक्षता समिती व अन्य विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी अन्न पुरवठा विभाग, रास्तभव दुकादार व ग्राहक यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. गोर गरीब जनतेला रास्तभाव दुकानदार यांनी योग्य सहकार्य करावे. येणाऱ्या अडचणींचे निरसन करून नागरिकांना सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलण्यात यावीत अशा अनेक महत्त्वपूर्ण सुचना केल्या. 
याप्रसंगी प.स. सभापती अंजनाताई पवार, माजी जि. सदस्य भिमराव पाटील  मडावी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणपत आडे, माजी उपसभापती सुग्रीव गोतावळे, सिताराम कोडापे, दक्षता समिती सदस्य सत्तरशाह कोटनाके, जयश्री गोतावळे, कांता श्रीसागर, रखमाबाई राठोड, शामराव गेडाम, सवित्रा गोटमवार, कलीम शेख, तहसीलदार ए.बी. गांगुर्डे, मुख्यधिकरी कविता गायकवाड, पुरवठा अधिकारी निरीक्षक सविता गंभीर, सहायक निरीक्षक प्रमोद मेश्राम, तालुका युवक अध्यक्ष सिताराम मडावी, बालाजी गोटमवार, रास्तभाव दुकानदार, नागरीक उस्थित होते. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top