Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बीए अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स  घुगुस - वेकोलीचे सेवानिवृत्त कामगार भगवान वाघमारे हे सुभाषनगर वसाहतीत क्वार्टर नं.195 येथे राहत असुन त्यांचा...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स 
घुगुस -
वेकोलीचे सेवानिवृत्त कामगार भगवान वाघमारे हे सुभाषनगर वसाहतीत क्वार्टर नं.195 येथे राहत असुन त्यांचा मुलगा प्रविण वाघमारे 22 याने राहते क्वार्टर मध्ये आज बुधवारला सायंकाळी 5.30 वाजता दरम्यान पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पवन हा बीए अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता परंतु तो लॉकडाऊन मुळे सुभाषनगर येथील आई वडिलांकडे क्वार्टर मध्येच राहत होता. आई कामानिमित्त बाहेर गेली होती व वडील झोपून असताना त्यांनी फाशी घेतली असल्याचे सांगितले जाते आत्महत्येचे नेमके कारण अस्पस्ट आहे. पोलिसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top