Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अमलनाला वेस्ट वेअर जवळ असलेल्या डोहा जवळ पर्यटकांना जाण्यास बंदी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पाटबंधारे विभागाने लावले फलक धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - पाटबंधारे विभागाने अमल नाला वेस्ट वेयर जवळ असलेल्या डोहाजवळ...
  • पाटबंधारे विभागाने लावले फलक
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
पाटबंधारे विभागाने अमल नाला वेस्ट वेयर जवळ असलेल्या डोहाजवळ पर्यटकांना जाण्यास  सक्त बंदी घालून तशे फलक वेस्ट वेयर परिसरात लावले आहे. आदेशाचे पालन न केल्यास पोलीस कारवाई करण्याची ताकीद पोलीस विभागाने दिली आहे.
अमलनाला धरण पूर्ण भरून वेस्ट वेअर सुरु झाला तेव्हा पासून सारखी पर्यटकांची  संख्या वाढली आहे. प्रसिद्ध झालेल्या अमल नाला ओव्हरफ्लो धबधाब्यावर जाऊन विहंगमय दृश्य पाहण्यासाठी दुरदुरुन पर्यटक येत आहेत. सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. पाण्यात भिजून मनसोक्त आनंद लुटतात, मात्र नव्युवकांच्या अतिउत्साह दाख्वत खोल पाण्यात उतरल्यामुळे एका महिन्यात 3 युवकांना जलसमाधी मिळाली आहे.
14 सप्टेंबर ला 2 युवकाचा बुडून मृत्यू होताच प्रशासन खडबडून जागे झाले. तात्काळ 15 सप्टेंबर ला पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सिंचाई विभागाचे अभियंता सय्यद अमीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पर्यटकांना दुर्घटना स्थळी जाण्यासाठी बंदी घातली व तशा प्रकारचे फलक पोलीस प्रशासन ने लावले आहे. लगेच दुसऱ्या दिवशी पाटबंधारे विभागाने प्रतिबंध दर्शविणारे बोर्ड लावले आहे. येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांनी त्या दुर्घटना घडल्या ठिकाणी असलेल्या डोहाकडे जाण्यास प्रतिबंध लावले आहे.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top