Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वरोरा व्यापारी असोसिएशनची चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थापना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर -  वरोरा व्यापारी असोसिएशनची स्थापना चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर - 
वरोरा व्यापारी असोसिएशनची स्थापना चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निशांत प्लाजा हॉल वरोरा येथे नुकतीच संपन्न झाली. बैठकीत वरोरा चे विविध व्यापारी उपस्थित होते. 
चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री यांच्या उपस्थितीत वरोरा व्यापारी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. सर्वानुमाते शम्भूनाथ वर्घने यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षांच्या सहयोगाने नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली यात उपाध्यक्ष प्रकाश चंगेडिया, उपाध्यक्ष महेश पोपट, सचिव नितेश (दादा) जैसवाल, सहसचिव योगेश डोंगरवार, कोषाध्यक्ष शैलेष शुक्ला कार्यकारिणी सदस्य विनोद शर्मा, राजू बोनगिरवार, अमित नाहर, हूज्जु भाई, गणपत भड़गरे, मनोज गुंडावर, शैलेष मालू, अभिजीत पद्मवार, राहुल झाड़े, संजय घोड़े, मनोज पद्मवार, अमित गुंडावर, राम लोया यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे मान्यवरांकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत करण्यात आले. याप्रसंगी वरोरा व्यापारी असोसिएशन ही चंद्रपुर जिल्हा व्यापारी महा संघाला संलग्न झाली असा ठराव ही सर्वानुमाते घेण्यात आला. व्यापारी असोसिएशनची स्थापना व कार्यक्रमाकरिता सर्वांनी परिश्रम घेतले. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top