Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्या...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे नुकताच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विठ्ठल थिपे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, संचालक रामचंद्र सोनपितरे, प्राचार्या स्मिता चिताडे, उपप्राचार्य विजय  आकनुरवार उपस्थित होते .
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कला शाखेतून प्रथम क्रमांक ९६.८३ टक्के गुण प्राप्त करून नदीम कमल जमील सिद्दिकी, द्वितीय क्रमांक ९१.६६ टक्के गुण प्राप्त करून भाग्यश्री छगन गेडाम तर तृतीय क्रमांक ८८.६७ टक्के गुण प्राप्त करून मीना दीपक नायक हिने पटकाविला. विज्ञान विभागातून प्रथम क्रमांक ९१.६६ टक्के गुण प्राप्त करून मोनी मल्लेश तंगडपल्लीवार, द्वितीय क्रमांक ९०.१६ टक्के गुण प्राप्त करून गौरव बंडू वरारकर तर तृतीय क्रमांक ८९.८३ टक्के गुण प्राप्त करून अवंती भाऊराव काकडे हिने पटकाविला. व्यवसायिक अभ्यासक्रमातून प्रथम क्रमांक ७६.१६ टक्के गुण प्राप्त करून चेतन रवींद्र नांदे, द्वितीय क्रमांक ७४.८३ टक्के गुण प्राप्त करून तृप्ती नितेश पिदुरकर हिने तर. तृतीय क्रमांक ६९.६६ टक्के गुण प्राप्त करून विनायक बालाजी कागणे याने मिळविला,
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्था व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले प्रास्ताविक उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले तर आभार प्रा. माधुरी पेटकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top