Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: केवळ स्वमालकीच्या भूखंडाचेच मोजणी शुल्क आकारण्यात यावे - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा, ना. थोरात यांनी मान्य केली मागणी, लवकरच निघाणार तोडगा शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रप...
  • महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा, ना. थोरात यांनी मान्य केली मागणी, लवकरच निघाणार तोडगा
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
परावर्तीत ले-आउट मधील स्वमालकीचे भूखंड मोजणीकरिता संपूर्ण  ले-आउट भूखंड मोजणी शुल्क भरावे लागत असल्याने भुखंड मालकाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामूळे मागणीनूसार केवळ स्वमालकीच्याच भुखंडाचे शुल्क जमीन मालका कडून आकारण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना केली. याकरीता आज मुंबई मंत्रालयात त्यांनी ना. थोरात यांनी भेट घेत सदर विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले. ना. थोरात यांनीही ही मागणी मान्य केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या सोयीप्रमाणे मोठ्या भूखंडाचे ले-आउट पाडून परावर्तीत भूखंड तयार करण्यात येत आहे. त्या ले- आउट मधील स्वमालकीचे परावर्तीत भूखंड मोजणी करावयाचे झाल्यास त्यांना संपूर्ण ले- आउट मधील भूखंड मोजणीचे शुल्क भरावे लागत आहे. सोबतच त्या ले-आउट मधील सर्व भूखंड मालकांना वेळ काढून मोजणी करिता उपस्थित राहावे लागत आहे. अश्या परिस्थितीत भूखंड मालकाला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामूळे परावर्तीत ले आउट मधील भूखंड हा एकच स्वतंत्र भूखंड ग्राह्य पकडून  स्वमालकीचे भूखंड मोजणीकरिता संपूर्ण ले-आउट भूखंड मोजणी शुल्क न भरता फक्त मागणीनुसार स्वतंत्र स्वमालकीच्या भूखंडाची मोजणी शुल्क आकारण्यात यावे. अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या मागणीकरीता आज त्यांनी मुंबई येथील मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सवीस्तर चर्चा करत सदर विषय त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानतंर ना. बाळासाहेब थोरात यांनीही ही मागणी रास्त असल्याचे मान्य केले आहे. त्यामूळे हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top