Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तुलाना तलावात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बैलांना पाणी पाजताना झाली दुर्घटना आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा तालुक्यातील तुलाना तलावात आज दिनांक 5 ऑगस्टला तुलाना गावात...
  • बैलांना पाणी पाजताना झाली दुर्घटना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील तुलाना तलावात आज दिनांक 5 ऑगस्टला तुलाना गावातील शेतकरी बाबुराव तुकाराम राऊत, वय 70 या शेतकर्‍याचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी अडीच वाजता ही दुर्दैवी घटना घडली. बाबुराव राऊत या शेतकऱ्याचे शेत तुलाना तलावाचे जवळ आहे. दुपारी अडीच वाजता हा शेतकरी आपल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी तुलाना तलावाचे काठावर आला. यावेळी बैल पाणी पीत असतांना अचानक हा शेतकरी पाय घसरून तलावात पडला आणि खोल पाण्यात जाऊन बुडून गेला. शेजारी शेतात फवारणी करणारे खुशाल राऊत यांना बाबुराव पाण्यात पडल्याचे दिसताच धावून आले. मात्र तोपर्यंत बाबुराव दिसेनासे झाले होते. त्यांनी ताबडतोब गावकऱ्यांना माहिती दिली. परंतु खोल पाण्यात बुडाल्याने बाबुरावाचा पत्ता लागला नाही. अखेर या प्रकरणी प्रेमसागर राऊत यांनी विरूर स्टेशन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अखेर शोधल्यानंतर प्रेत सापडले आहे. विरूर स्टेशन पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृत शेतकऱ्याचे मागे पत्नी, दोन मुले व एक विवाहित मुलगी आहे. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top